पाउस

Started by केदार मेहेंदळे, August 26, 2014, 03:32:26 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

वनात पाउस जनात पाउस
गळके छप्पर घरात पाउस

उभे पिक हे जळू लागता
डोळ्या मधल्या पुरात पाउस

सुरकुतलेली माय आठवली
झरू लागला उरात पाउस

डबकी, होड्या आता न दिसती
बाल पाणीचा मनात पाउस

गाणी, गप्पा, चहा, पकोडे
चला भोगुया सुखात पाउस

श्रावण मासी हर्ष मनासी
उन्ह क्षणात, क्षणात पाउस

सावळ कांती भिजवून वेडा
गाऊ लागला सुरात पाउस

स्पर्श चोरटे छत्री मधले
सामील आहे कटात पाउस

पहाट फुलली मिठीत जेंव्हा
तेंव्हा होता भरात पाउस

पिकले केस, फिकीर कशाला?
बराच आहे ढगात पाउस

केदार...

Mrunali Gaikwad

khupach mannmohak kavita .....

apratim.....................