अनोळखी

Started by कवी : गणेश दामोदर गायकवाड, August 31, 2014, 12:13:46 PM

Previous topic - Next topic
रती  जागविल्या  मी  तुझ्यासाठी,  किती सांगू मी सखी ,
ओळखही नाही दिलीस तू मला , मी झालो अनोळखी ...

तुझ्या शब्दांचे हार गळा घालुनी, फिरलो दारोदार मी सखी,
विसरलीस तू  दिल्या शब्दांना , माझे  हास्यही  झाले  अनोळखी  ...

भावनांचे हुन्द्कारगीत गात आहे  , तुजसाठी मी सखी,
तुझ्या शब्दांनीही  साथ सोडली , माझ्या गीताची , माझे गीत ही  झाले अनोळखी  ...

कसला हा प्रवास ,संपेनाही  वाट ...  कधी होईल पहाट?  , सांग  ना सखी ?
थकलो आता मिटतो डोळे ,ही वाट  आहे मजसाठी अनोळखी ...

कवी ,
गणेश  दामोदर गायकवाड
०९८३३९६४४७६