पावसा! तू ही जरा बदल.

Started by केदार मेहेंदळे, September 08, 2014, 10:20:02 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

दिवस आता बदलत चाललेत
पावसा! तू ही जरा बदल.
शहरात कमी आलास तरी चालेल.
धरणं अनं शेतात कोसळ!

शहरातही हवाच असतोस रे तू,
पण आलास की अडचण होते सगळ्यांना.
म्हणून म्हणतो आता जरा बदल,
दिवसा पेक्षा, शहरात, रात्रीच कोसळ!

तू सुध्धा झालायस आता म्हातारा.
जसा असून अडचण नसून खोळंबा.
म्हणून म्हणतो आता जरा बदल,
खोळंबा करण्यापेक्षा जपूनच कोसळ!

कधी वाटतोस तू जुन्या सणां सारखा.
आवडला तरी सोईनी यावा जसा.
म्हणून म्हणतो आता जरा बदल,
ज्याच्या त्याच्या सोयीनी तू कोसळ!

हं! कधी सुटीला, शनिवार, रविवारी,
हवा असतोस तू, पिकनिक स्पॉटला.
म्हणून म्हणतो आता जरा बदल,
शहरात नको पिकनिक स्पॉटला कोसळ!

दिवस आता बदलत चाललेत
पावसा! तू ही जरा बदल.


केदार...

शनिवार रविवार पावसानी उसंत घेतली होती. आज साकळी office ला निघालो आणि पाउस हजर!

sweetsunita66

वरुण राज्याला केलेली विनवणी आवडली !!