श्रावणमास

Started by Kavyashubha, September 08, 2014, 11:15:19 PM

Previous topic - Next topic

Kavyashubha

प्रसन्नतेचे रुप घेऊनि श्रावणमास हा यॆई,
व्रतवैकल्यांची सुरवात दीपपूजनाने होई |

प्रत्येक दिवस अन तिथीला महत्व असे,
पावित्र्य अन मांगल्याची भावना मनी वसे |

शिवपूजनाने सोमवारची पहाट पावन होई,
तेलाच्या अभिषेकाने शनिवारी मारुती प्रसन्न होई |

मंगळागौरीची मजा लूटण्या सख्या साऱ्या जमती,
मनोभावे गृहीणी शुक्रवारी जिवतीला पुजिती |

सापही आपले असती सोबती सांगे नागपंचमी,
अन्नाचाही आदर करण्या शिकवे शिळसप्तमी |

अर्पूनी नारळ बेभान सागरा पौर्णिमा ही शांत करी,
महत्व लोण्याचे मुलांस पटवी कृष्णाची दहीहंडी न्यारी |

जीवनामध्ये सर्वोच्य असे स्थान मातेचे,
योग्य आदर करा तिचा सांगणे पिठोरीचे |

बैलश्रमाची किंमत बळीराजा पुरेपूर जाणतो,
पोळ्याला कौतुक बैलाचे मनापासून करतो |

जरा वेगळया विचाराने पूजा आपण करू,
दुध तेल अन्न देऊनी गरीबा तृप्त करू |

वाया जावे अन्न हे देवालाही मान्य नसे,
प्रत्येक मनुजामध्ये शेवटी ईश्वराचा वास असे |


शुभांगी,
बोरीवली, मुंबई

sweetsunita66