:) :) :)धरा :) :) :)

Started by sweetsunita66, September 12, 2014, 01:11:25 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

 :) :)  :)धरा  :) :) :)
अग किती तुझे रंग
ममता रुपी धरा 
उन्हाळ्यात हिरमुसली
पावसाळ्यात तोरा

हिरवा शालू पांघरून
नवं वधू जशी
मिलनाच्या क्षणी
प्रेयसी जशी

मेघांची वाट पाहे
आतुरतेने कशी 
बरसले बादल झाली
नव यामिनी जशी

निरंतर फुलत आहे
तुझे अप्रतिम सौंदर्य 
बघता वाटे मनमोहक
नव यौवना कौमार्य

शीत ऋतू  येताच
तुझे लोभसवाण रूप 
निरंतर न्याहाळावे
मनाला भुरळ घाले खूप ...। सुनिता .... ५जुलै १४ :) :)