भाविक

Started by amoul, September 12, 2014, 06:14:12 PM

Previous topic - Next topic

amoul


तू गेलास आणि सुने पडले मंडप, सजावटी, नक्षीदार पडदे,
सगळा गजबजाट, गर्दी, रांगा,  गालिछे,
रस्त्या रस्त्यावरची रोषणाई, फुलांच्या माळा,
आणि सुने पडलेयत एकतेचा संदेश देणार्या टिळकांच्या प्रतिमा.
आता सुरु होतील तुझ्या नावावर कमावलेल्या पैश्याच्या  राशींच्या वाटण्या.
आणि सुरु होतील लिलाव तुझ्या श्रद्धेचे, प्रेमाचे,
आणि तुडुंब भरतील काही ठराविक पोटे.
पण विसर्जन सोहळ्यात एखादा भाविक या सगळ्याचा विचार न करता,
प्रेमाने आणि अगदी आकंठ हृदयाने स्वताची दुख विसरून तुला निरोप देत होता.
तू पुढल्या वर्षी येशील परत फक्त त्याच्यासाठीच.
पण या देव भाविकाच्या भेटीत अशाश्वत लाभ घेणारा तिसराच कुणीतरीही तुझी वाट बघतच असेल.


अमोल