तिच्याकडे भेद नाही आपल्या-परक्याचा

Started by amoul, September 12, 2014, 06:15:49 PM

Previous topic - Next topic

amoul


तिच्याकडे भेद नाही आपल्या-परक्याचा,
ती प्राजक्ताचा सडा तिला हवे त्याने वेचा.


ती मुक्त कळी फुलणारी बंधने झुगारणारी,
ती मर्यादा सारून सार्या गंध दरवळणारी.


ती नित्य नवी पालवी चेतना संचारलेली,
जुनेपणाच्या दाराशी नाविन्य स्वीकारलेली.


उन्हाच्या झेलून झळा धरते मायेची सावली,
ती केवळ प्रेमाच्या दोन शब्दास्तव असावलेली.


ती तेजस्वी किरणांची प्रफुल्लीत उज्वल प्रभा,   
करुणामय स्पंदनानी भारलेल्या  हृदयाचा गाभा.


प्रेम, करुणा, माया, ममता, आशा ती म्हणजे,
शब्द नाही कोणता जो तिच्या अभिव्यक्तीला साजे.


Amol