तडकलेला वर्तमान

Started by Anil S.Raut, September 20, 2014, 08:32:17 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

हरवलेल्या भुतकाळातील
आठवणींचे सुखद तुकडे
जमवतोय तडकलेला वर्तमान...
....फसलाय तो....!
भविष्याची क्रुर आवर्तने
दडपुन टाकायचा
चाललाय त्याचा एक निष्फळ प्रयत्न-
सागरात सोडलेल्या
कागदी होडीसारखा.....!


©  किमया