चार ओळी

Started by Pravin Raghunath Kale, September 27, 2014, 05:08:24 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

विरहाचा एकांत हा
मनात दाटत राहतो
डोळ्यात अचानक मग
अश्रूंचा पाझर फुटतो

दगडाला भावना नसतात
तरीही देव दगडात असतो
खरच सांगतो सखे
प्रेम फक्त खेळ नसतो

पावसांच्या सरीसोबत
आठवण तुझी आली
मनसोक्त भिजायला
तुझी उणीव भासली

माझ्यासोबत पावसात
तू नव्हतीस भिजायला
पाऊसही मग
कंटाळवाणा होऊन गेला

भावनाचा हा कल्लोळ
विस्फोट मनात झाला
आठवणीचा हा प्याला
अश्रूत भिजून


प्रविण रघुनाथ काळे
८३०८७९३००७

sheetalk