स्वातंत्र

Started by Mangesh Kocharekar, September 29, 2014, 08:54:30 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar

                       स्वातंत्र
त्यांनी आम्हाला दिले स्वातंत्र, नव्यान कळला जगण्याचा अर्थ
स्वातंत्र्याचा आम्ही लावला अन्वयार्थ,साधत गेलो स्वतःचा स्वार्थ
स्वातंत्र शब्द घेतला घोटून,आपापसात पदे घेतली वाटून
स्वातंत्र्यासाठी ज्यांनी रक्त सांडले,कौतुक करून दिले हाकून
खादी अन टोपी हि आयुध, खुंटीला ठेवली दिसतील अशी टांगून
    तत्वांना दिली सोड चिट्टी,धूर्तपणा हीच नेत्याची शक्ती
    उभारून तिरंगा घरावरती,जगाला दाखवली आमची भक्ती
    पापभिरू माणसासाठी ,एवडी नक्कल हि ठरते युक्ती
    पंधरा ऑगष्ट,नको कष्ट,भाषणाच्या सोबत ठेवल्या चळती
    आमच्या आवेशी शब्दांन,गुंग होई ऐकणाऱ्याची मती
देश चालवण्यासाठी हाती हवे पद अन सत्ता
सत्ताधारी अन विरोधी कुणात असते नितीमत्ता
पक्ष कोणताही असो घरी अल्लद चालत येतो हप्ता
कार्यकर्ते घडवणे ,पोसणे हि नाही नुसती चेष्टा
इतके सारे करायचे म्हणजे हाती हवाच ना पैका
   आम्हाला सापडली जादूची छडी म्हणूनच घेतली उडी
   राजकारण करायचे म्हणजे हवी सरकारी फुकटची गाडी
   घड्याळ कि इंजिन फरक नसतो चिन्हात
कमळाच्या देठासही अस्पृश नाही आमचा हात
म्हणूनच आजही टिकून आहोत पक्ष बदलतो रातो रात 
मंगेश कोचरेकर