विरह गीत

Started by Mangesh Kocharekar, September 30, 2014, 09:22:50 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar

           विरह गीत         
काही अटीवर त्यांची जमली घट्ट मैत्री
त्यांची भेट व्हायची एकांती उत्तर रात्री
ती बिचारी थकलेली अन तो अति उत्साही
त्याच्या चेहऱ्यावर तजेला अन भेटीची घाई
तिच्या श्रमांना नव्हता अंत,फुर्सतीला उसंत
तो स्वस्थ,मस्त जणू वैरागी आनंदी संत
थकली,श्रमली तरी ती नाही म्हणत नव्हती
तिच्या त्यागाची जळत होती अखंड वाती
त्याची तर तिच्यावर हक्काची असे सक्ती
तो तिच्या बाहूत डोळे मिटून होई शांत
टी त्याचे मुके घेत संपवून टाकी मनाची खंत
पूर्व उगवताच तिची लगबग वाढायची
गालातल्या गालात मंद मंद हसायची
तू थांब मी भेटून येते लडिवाळपणे सांगायची
त्याच्या तेजाने दिपून लाजून चूर व्हायची
त्याची याचना करत मागे मागे फिरायची
थकून भागून पावले तिची वाटेतच थबकायची
प्रेमाची परीक्षा त्याने किती काळ घ्यायची
भोळी भाबडी प्रेमाखातर गर गर फिरायची
इतके सारे सोसूनही कधी न थांबायची
तिच्या बाळालाच तिची दया यायची
अश्रू लपवत रोज रात्री त्यालाच कुशीत घ्यायची