स्वप्न असे की. .

Started by Pravin Raghunath Kale, October 01, 2014, 02:14:58 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

स्वप्न असे की
सत्य समोर
मनास काही समजेना
तु मिठीत माझ्या
मनी विश्वास बसेना

जणू स्वप्नच आज
उतरले आहे सत्यात
आनंद माझ्या मनाचा
मावेना झाला शब्दात

मनाची माझ्या इच्छा
आज पूर्णत्वास गेली
तू आज माझ्यात
सामावून गेली

प्रसंग हा आजचा
स्वप्नच होते जणू
विचार होतो मग
याला सत्य का म्हणू...


प्रविण रघुनाथ काळे
8308793007