हरकत नसेल तुझी तर..

Started by सुमित, October 09, 2014, 12:38:33 AM

Previous topic - Next topic

सुमित

हरकत नसेल तुझी तर एक चूक करू का ?
हरकत नसेल तुझी तर..

लागतील तुला उन्हाच्या झळा
एक नोटबुक चेहऱ्याआड धरू का ?
हरकत नसेल तुझी तर..

भिजशील अचानक पावसात
छत्री डोक्यावर तुझ्या धरू का ?
हरकत नसेल तुझी तर..

थरथरशील कडाक्याच्या थंडीत
स्वेटर खांद्यावर तुझ्या ठेऊ का ?
हरकत नसेल तुझी तर..

सोडशील काळेशार केस मोकळे
अबोली वा मोगरा त्यावर माळू का ?
हरकत नसेल तुझी तर..

भेटशील एकटी भर रस्त्यात
एक गुलाब तुजसमोर धरू का ?
हरकत नसेल तुझी तर..

हसशील लपून छपून गालात
लाजण्याला तुझ्या होकार समजू का ?
हरकत नसेल तुझी तर..

सुमित 9867686957..

Gopichand Walkoli

Sumit,
     Chhan kavita aahe.  Ashach kavita karat raha.

सुमित

प्रयत्न नक्की करेन• धन्यवाद ---

prashant divekar

Khup chaan aahe kavita..pudhil vatchalis subhechaa..

Nikki


Nikki