अश्रु माझे लपवण्यास, मेघ सावळे झाले......

Started by Shraddha R. Chandangir, October 09, 2014, 11:04:35 AM

Previous topic - Next topic

Shraddha R. Chandangir

क्षण गेले निसटून
मन गहीवरून आले
अश्रु माझे लपवण्यास,
मेघ सावळे झाले.

ओरबाडले त्या फुलास
कत्तल त्यास केले
गंध हिरावला त्याचा
अन् काटेही कोवळे झाले.

चर्चा केली त्यांनी
सांत्वन देण्यास आले
ढोंग सारे रचण्यात
मग लोकही हळवे झाले.

वनवास झाला रामाला
भाग्य त्याचे बुडाले
नाते हरले सगळे
पण त्याचेही सोहळे झाले.

गुन्हा  केला त्यांनी
आरोपी मज ठरवले
दोष आपला नाकारण्यास
मग ते ही भोळे झाले.
[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]

Anil S.Raut

व्वा !अनामिकाजी  शब्द आणि विचार इतके मस्त आहेत
कि प्रतिक्रीया देण्यावाचून रहावले नाही..शब्दांच्या वचनात
थोडी गल्लत होते एवढेच   बाकी खुप छान!

लाखमोलाची गोष्ट:-अनामिका जरी असलात तरी
कवितेखाली आपले नाव असावे...शुभेच्छा!