* चंद्र-कवी *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 12, 2014, 11:30:13 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* चंद्र-कवी *
कवींच्या दरबारी चंद्र
नेहमीच लाचार असतो
कारण नसतांना ही
बदनाम होत असतो

कधी कुणाची प्रेयसी
बनुन दिसत असतो
तर कधी लहाणग्याचा
मामा बनत असतो

कारे छळता मला
चंद्र कवींना विचारतो
मग कवी पुन्हा
चंद्रावरच कविता लिहतो

चंद्र स्वतालाच म्हणतो
अमावस्येलाच बरा असतो
कारण पौर्णिमेला पुन्हा
कवींना मोका मिळतो...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai