किनारा

Started by विक्रांत, October 13, 2014, 10:01:47 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


केसात गुंफुनी वारा
रेखुनी कपाळी तारा
भटकेल भोवती मी 
होवूनि तुझा किनारा   
 
मातीत माखु दे टाचा
चटका बसो उन्हाचा
प्रत्येक स्पर्श सुखाचा
असेल तुझ्या जलाचा

ते रंग मावळतीचे
गूढ गुंजन अंधाराचे
हे ह्रदय तारकांचे
मन होय प्रकाशाचे

जनरीत व्यवहार
मज नकोच आता ते
सुटुनी बंध अवघे 
तव कुशीत येवू दे 

भय द्वेष दु:ख चिंता
सारे हरवून जावे   
यशगान कीर्ती प्रीती
तुलाच सदैव ध्यावे

विक्रांत प्रभाकर