शुभ दिपावली

Started by शिवाजी सांगळे, October 15, 2014, 07:21:03 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे




मांगल्य दिव्यांचे, सजले अंगणी,
प्रकाश कंदीलांचा, उजळे गगनी !
सजती रंगसप्त, इंद्रधनु रांगोळयांचे,
स्वादिष्ट रूचकर, ताट फराळाचे !
घेऊनी आनंद, सण वर्षाचा
उजळवी जीवन, सण दिव्यांचा !
वाटावा सुखानंद, राहो ईच्छा,
सर्वांना दीपावलीच्या, खूप शुभेच्छा !

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९