सखे दीवा जाळ ...मन नको ...

Started by durga, October 17, 2014, 05:37:22 PM

Previous topic - Next topic

durga

आर्मी जवान सूरज जाधव यांच्या
विनंतिला मान देऊन सीमेवरील सैनेकाच्या
भावनाचे कविता रूपी वर्णन
काही चुकि चे लिहले गेले असेल तर क्षमा असावी
***********************************

मी इथ देशाच्या सीमेवर , तू तिथ.. मन कस काहुरत
पत्र तुझ आल्यावर मन थाऱ्या वर नसत
खुप दिवसानी तू मनातल लिहलस काय ???
म्हणुन मन स्वतःला विचारत
पण आपल्या घरातील मातीचा वास आला न की
मनाला एक समाधान मिळत
तुझ्या सोबत श्रावणात खेळलेला झोका मनाचा ठोका चुकवतो
तो होळी चा रंग , इथ सीमेवर जास्तच लाल भासतो
आपल्या अंगनातील पारिजात बहरला असेल ना .... ग ....
इथ पण आहे मी सकाळी परेड ला गेलो ना हमखास झाडाखालुन जातो
एखादे फुल अंगावर पडले ना की तुला भेटल्याच समाधान भेटत

पत्र उघडले की तुझाच चेहरा दिसतो
त्यावर पडलेले तुझे अश्रुचे थेंब अलगद ओठानी टिपतो ...
निरागस चेहरा कपाळी कुंकू
भांगात सिंदूर हतातील हिरवा चुडा
डोळे भरून बघतो

आई-बाबांचा साभाळ, भाऊ बहिनिची काळजी इथ सार विसरतो मी...
कारण तू आहेस ना माझी बाई
माझी रणरागिनी माझ्या घराची लक्ष्मी ...
माहित आहे मला तू ही आठवत असशील मला क्षणाक्षणाला
भासही होत असतील तुला
आपल्या प्रेमाच्या भेटीचे ...
डोळे ही भरुन येतील तुझे
पण मी पुसायला नाही ...

मी देशाच्या सीमेवर माझ्या आईच
रक्षण करत आहे ...
खुप नराधम़ा पासून तिला वाचवायचे आहे
तू संभाल स्वतःला , अभिमानी हो
स्वाभिमानी हो ...
देशाची सेवा करण्याचे भाग्य खुप कमी जनाना भेटते
ते मला मिळालेल आहे
खरच मी भाग्यवान आहे
मी या धरती मातेच काही तरी देन लागतो तिची सेवा ही
या जन्मी पाहिले कर्तव्य ....

मी नाही येउ शकनार दिवाळी ला
अंगनात दिवे जाळ , मनाला नको...
माझी दिवाळी माझ्या सिमेवर
गोळीबारात, तोफा मधे
सखे दिवे जाळ ... मन नको जाळु ..

               दुर्गा वाड़ीकर
             My mo no   7038922384