तिची साधना

Started by विक्रांत, October 24, 2014, 08:28:26 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

( मित्रांनो ,म्हटले तर ही प्रेम कविता आहे म्हटले तर ध्यान आकांक्षा)

साक्षीची ही साधना
किती सोपी साधी वाटते
पण जाता तिच्या वाटेला
अनवट वळण तिचे कळते

तिला वश करायला
प्रयत्न करा कितीही
ती मुळीच बधत नाही
ढुंकूनही पाहत नाही

अशी एवढी आवडूनही
असा जीव जडवूनही
तिच्या स्वरुपी मला
शिरताच येत नाही

लाख यत्न करूनही
मात्रा काही चालत नाही
तिचे अंतरंग मला
मुळीसुद्धा कळत नाही

आज नाही तर उद्या
ती मला नक्की कळेल
या नाहीतर पुढील जन्मी
एकरूपता नक्की घडेल

परंतु तोवर डोळे
तिच्या वाटेवर लावून
तिचे ध्यान धरून
तिच्याच साठी फक्त जगेन

विक्रांत प्रभाकर