पहिल प्रेम .....दुसर प्रेम ???

Started by Surya27, October 25, 2014, 11:57:02 PM

Previous topic - Next topic

Surya27

पहिल प्रेम .....दुसर प्रेम
खर तर अस काही नसत....

प्रेम हे फक्त प्रेम असत.
प्रेम हे मनात वसत....

म्हणून प्रेमाला
क्रमवारीत बसवायचं नसत

प्रेम ठरवून करायचं नसत.
ठरवून केलेलं प्रेम हे खर प्रेम नसत.

क्षणिक वासनेचा उभार असतो
त्याला खऱ्या प्रेमाचा आधार नसतो.

प्रेमाला जात-धर्म नसतो .
प्रेमाला काळा-पांढरा रंगही नसतो.

खऱ्या प्रेमाला स्पर्शाचा हव्यास नसतो
प्रेमाला भावनेचा शृंगार असतो .

प्रेमाला शब्दांची गरज नसते
प्रेमाची भाषा केवळ नजरेनेही कळू शकते.

प्रेम हे फक्त प्रेम असत
पहिलं , दुसर ,तिसर ......
उगीचच आकडेमोड करत बसायचं नसत....
प्रेम फक्त निस्वार्थी मनानं करायचं असत......

........................................................ सूर्या

Jawahar Doshi