जल्म

Started by anuswami, October 27, 2014, 07:23:52 PM

Previous topic - Next topic

anuswami

***जल्म***

आर देवा

माज्याव दुक्काच डोंगर कोसळत्याती
मी हाय का नाराज तुज्याव कदी?
तूच समद्यांचा पाठीराखा हाय म्हण
आन करताकरविता म्हनत्यात तुला समदी


पोर शिकाव आपल नीट म्हणून
मायन मोडल्यात्या कानातल्या रिंगा
बा ला कदी तिची हाय का र माया
रोजच घालतुय पिउन धिंगा


मास्तरानी शिकिवलय आमास्नी साळत
दारू बगा लई वाईट आसती
पर मास्तराला काय मायती र
माज्या बा ची गाडी रोजच टाइट आसती


मले लई कीव येते बग मायेची
दिसभर माज्यासाठिच राब राब राबती
बा पिउन आल्यावर मारितो तिला
आन ती रडतच उपासपोटी झोपती


खरच सांगतू बग देवा तूला
मले नाय सन व्हत आता ह्यो तरास
बा न कदीच नाय लावली र माया
ना खाऊ दिला आमाला सुकाचा घास


मला नगूय बग काइच तुज्याकुंड
फकस्त मायला सुकात बगायचय
बा चा इचार कदीच सोडलाय मी
माय साठिच मला आता जगायचय


शेवट येकच इनवितो बग तूला
मायेला माज्या सुकात रावू दे
या जगातून म्या जाताना
तिची वटी आनंदान वाहू दे


नमतो र तुज्या चरणी मी
सन नायत व्हत आता नशीबाची जूलमं
मले भिक्कारी बनवलस तरी चालल
पर आसल्या पेताडयाच्या पोटी.....
नगू दिवूस पुढला जल्म


कवी - अनिकेत स्वामी, अकलूज
९५५२०३०८२८

वैजयंती

आन करताकरविता म्हनत्यात तुला समदी

~~~~~~~~~~~~~~~~~~~

म्हनत्यात मला करताकरविता खूप लोगं
पन नाय रं, बाबा, म्या करताकरविता
समद्या भल्याबुर्‍या गोस्टींचा;
भल्या गोस्टी करतूया म्या, करवितो म्या
बुर्‍या गोस्टी करतूया/करवितो दुसरंच कुनी.