सर खर सांगतोय

Started by Mangesh Kocharekar, October 29, 2014, 03:11:26 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar

      सर खर सांगतोय

सर खर सांगतोय मला इंजिनीअर ,आणि डॉक्टर व्हायचं नाही
सर खर सांगतोय मला प्राध्यापक अन शाळा मास्तर व्हायचं नाही
सर खर सांगतोय मला ड्रायवर अन कंडक्टर पण व्हायचं नाही
फारच काय पण मला सैनिक ,अन पोलीसही व्हायचं नाही
सर कारण विचारू नका पण अशा पेशान अन पैशान जगायचं नाही
    सर विश्वास नसेल तरी ऐका पण ह्या नाहीत बर पांढर पेशा थापा
    आज काल  डिग्री फुटपाथवर मिळते बस फक्त नोटांची थप्पी टाका   `
    सर प्रत्येक जणाला हवा फक्त पैका डिग्री हा त्याचा पहिला नाका
     मग मात्र वणवण भटकंती अन सतत चुकतो र्हिद्याचा नियमित ठोका
     पण असेल श्रेष्ठींशी ओळख अन बैठक तर साधता येतो अल्लद मोका
सर खरच संगोतोय आजकाल इमान ,निष्ठा शब्द फारच  गरीब
ज्याच्या हाती सत्ता ,संपत्ती तोच बदलवतो आपल्या आप्तांच नशीब
खून  करून अन अड्डा चालवून लोक कमावतात समाजात नाव
आपल्या नावा पाठी अन पुढेही लावतात राव त्यांना असतो बाजारात भाव
आम्ही शिकुनही   अडाणी चार पैशाच्या नोकरीसाठी करतो धावाधाव
     म्हणूनच सांगतो सर  शाळा शिकण्यावर माझा नाही मुळीच विश्वास
     शिकुनही आम्ही अडाणी भीतीपोटी कधिही अन कुणीही  घेतो आमचा घास 
      सुरे अन बंदुका ,अन आत्ता तर नुसत्या सहिनी थांबवतो नेता आमचा श्वास
      सर जगण्याची हमीच नसतांना कसा घ्यावा नुसत्या पुस्तकी ज्ञानाचा ध्यास
      सर खरच सांगतोय जगता येईल अस द्या शिक्षण ,बदला फुटकळ अभ्यास
   
                                              मंगेश कोचरेकर