मनासी लगाम

Started by Mangesh Kocharekar, October 29, 2014, 07:57:43 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar

  मनासी लगाम
मनाचिये गुंती ,गुंतलासे तुझा जीव
ना दिलास दिलासा , न उठाठेव आता जमे
कष्टाविन जिणे,फुकाचा आहार, चुकीचा व्यवहार 
प्रेमाचा व्यवहार ,ऱ्हीद्यी अंधार, काय कामी ?

तत्व कैवल्याचे ,विचार सापाचे
अभद्र मनासी,अविवेकी डोहाळे
मानवाची जात,दैत्याचा आघात
कृतीला न बांध,का म्हणावा माणुस?

घेऊनी सन्यास, वंशाचाच ध्यास
चंदन कपाळी,ना लगाम मनास
विरक्तीची आस खोटी मनी
स्वतःचा उपहास करू काय जाणे ?

उथळ मनासी सत्याचा अभाव
देखे तेच सत्य,गृहीत मनासी
नाही शांती मना,युद्धाची कामना
भ्रमर भावना, मना कैसी शांती ?   
मंगेश कोचरेकर