वर्‍हाडी ठसका क्र.(५)

Started by pomadon, November 10, 2009, 02:54:25 PM

Previous topic - Next topic

pomadon


  वर्‍हाडी ठसका क्र.(५)
     पोट्टच पाहिजे
एका रात्री बायको मायी कानात कुजबुजली
म्हणाली तीन चार वर्षाची मेहनत रंगत आली!
बाप होण्याची मायी पहिलीच होती पाळी
त्याच ख़ुशी-खुशीत दरी आली दिवाळी!
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बायकोच्या पोटात कळ आली
त्याच दिवशी माया घरी लक्ष्मी चालत आली!
पहिलचं पोर ह्मणून लाड भारी झाले
दोन वर्षानंतर पुन्हा पाय भारी झाले!
या खेपेला पोट्टचं व्हावं वाटत होतं मले
अंदाज चुकला माया पोट्टीच झाली मले!
म्हणलं दोन पोरींवरच बंद करावं प्रोडक्शन
वंशाचा दिवा जळलाच पाहिजे म्हणून बापानं देल्लं टेंशन!
माय म्हणाली बापू दुसरी बायको पाय
मी म्हणलं कायले तिच्यावरचं करतो try!
माय-बाप म्हणे एकाच नातवाचं तोंड पाहायचं आम्हाले
नातीनचं झाली त्यायले ते पाहाले मायबाप नाही राहिले!
सगे सोयरे म्हणाले नवसाचं होईलं नवस करून पाय
म्हणून गेलो देवाकडं धरले त्याचे पाय!
नावासले देव अजून पावला नाही तोच निगला भारी
एक पोट्ट म्हणता म्हणता मले सात झाल्या पोरी!


sandeep.k.phonde


anildgawali

ram ram pavn! varadatale disata rao.
zyak jamali ki kavita. zakkas!


pritee ingole


pritee ingole


GANESH911

माय म्हणाली बापू दुसरी बायको पाय
मी म्हणलं कायले तिच्यावरचं करतो try!


BHANNNAAATTTT....... :D :D :D

Ekantacha varasdar

LaiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiBhariiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii