कडी लावताच चंदू मधला जागा होतो राक्षस.

Started by Shraddha R. Chandangir, November 19, 2014, 12:30:50 AM

Previous topic - Next topic

Shraddha R. Chandangir

एका घरी असते एक सुंदर परी
दीसायला नाजुक आणि रंगाने गोरी.

आठ वर्षांची बाहुली ती खूपच गोड
तीच्या गोडीची असते सगळ्यांनाच ओढ.

ताप येऊन जेव्हा ती पडते आजारी
निराश होतात आई-बाबा, आणि सोबतच शेजारी.

परी सोबत खेळतात माऊ आणि बोका
सोबतच शेजारचे चंदू काका.

चंदू काका असतो जेव्हा एकटाच घरी
परीला नेण्यास तो येतो तीच्या दारी.

परी साठी आणतो तो नवनवा खाऊ
बाबांसाठी असतो तो सख्यासारखा भाऊ.

चंदू काका एकदा तीला घरी झेऊन जातो
Bed वर बसऊन तीला, दार लाऊन घेतो.

परी गेली चंदूकडे,  बाबा जेव्हा ऐकतात
घरच्यासारखा माणूस म्हणून ते ही बिंदास होतात.

काका म्हणून चंदूकडे खेळायला येते ती निरागस
कडी लावताच चंदू मधला जागा होतो राक्षस.

काही न कळून अचानक ती होते कावरीबावरी
हात पाय झटकून म्हणते, मला जाउदे काका घरी.

तोंड दाबताच परीचा आवाज घुमायचा थांबतो
काका सारख्या पवित्र नात्यातला, अर्थ ही कुठेतरी हरवतो.

परीला परत नेण्यास जेव्हा दार ठोठावते आई
दार उघडून चंदू म्हणतो, घेऊन जा तीला ताई.

घरी जाताच परीचं बोलणं कमी होतं
नेमकं काय झालं हे तीलाही कळलेलं नसतं.

नेहमीपेक्षा बाबांना ती हरवल्या सारखी भासते
Homework केला नसेल हो तीने, म्हणून आई ही मग हसते.

आपल्यापैकी कीत्येकांकडे अशीच असते परी
लाड जीचे करत असतात नातेवाईक आणि शेजारी.

आपल्या प्रत्येक शेजार्यात अमानूषपण नसतं
पण दाराआड घडणारं आपल्यालाही माहीत नसतं.

आपल्या नाजूक परीला आपण जिवापाड जपतो
त्याच परीची हेळसांड एक राक्षस करू शकतो.

अश्या राक्षसांपासून आपण सतर्क रहायला हवं
विश्वास ठेवण्याआधी त्यांना परखून बघायला हवं.

- अनामिका
[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]

सतिश

Many  Congratulations अनामिका.. " कडी लावताच .." या कवितेत आपण एक संवेदनशील विषय अतिशय ताकदीने मांडला आहे.. हि कविता नक्कीच उच्च प्रतीची आहे.. मला वाटते तुम्ही कवितेच शीर्षक थोडे बदलून किव्वा असेच ठेऊन हि कविता आणखी मोठ्या व्यासपीठावर प्रकाशित करायला हवी..  It's just an Excellent job..!

Shraddha R. Chandangir

thnku Satish...  :) Aani kharach...  asle vishay aaj samajaat gambhirtene ghenyachi garaj aahe!!  aani mhanunach ha mudda saglyanparyant sadhya aani sopya bhashet pohochavnyacha maza ha ek prayatna!!
[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]

Shraddha R. Chandangir

thnku Satish...  :) Aani kharach...  asle vishay aaj samajaat gambhirtene ghenyachi garaj aahe!!  aani mhanunach ha mudda saglyanparyant sadhya aani sopya bhashet pohochavnyacha maza ha ek prayatna!!
[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]

Shraddha R. Chandangir

kavitela asa shirshak denya maagcha kaaran evadhach ki kavita vachnya adhi vachnaryala kavitetla nemka mudda kaay yacha thoda andaaj yayla pahije!! kavita sadhya aani  saral shabdat aahe..  mhanun shirshak hi tasach sadhya aani sopya bhashetla aahe!!