स्मराव कि विस्मराव?

Started by शिवाजी सांगळे, November 25, 2014, 12:03:02 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे


स्मराव कि विस्मराव?

स्मृतींचाच खेळ सारा
स्वप्नांमध्ये कल्लोळ होतो,
घाव अखंड अश्वथाम्याचा
हुद्यातून माझ्या ओघळतो !

अक्षय तुझ्या वाटेवर
रक्तथेंब एक गोठलेला,
दिसेल वळून पाहिल्यावर
पावलांनी माझ्या सोडलेला !

हरलोय डाव जीवनाचा
कळेना कसा जिंकू ?
स्मराव कि विस्मराव
तूझ्या कपाळीच कुंकू ?


© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९