मी एक भ्रष्ट अधिकारी

Started by kasturidevrukhkar, November 25, 2014, 12:50:10 PM

Previous topic - Next topic

kasturidevrukhkar

जन्मोजन्मीचा  करुन   प्रवास
माणसाचा जन्म आला  नशीबास,
म्हटले आता थोडी सवलत मिळाली
काहीतरी  करण्याची वेळ  ही आली

बाराच्या  ठोक्याला  , प्रवेश केला  जगात
माझ्या  येण्याचा आनंद होता सर्व घरात

बालपणीचा  सोहळा  आनंदात पार पडला
वाढत्या  वयाबरोबर  माझ्यातील ,
माणूस  जागा  होऊ  लागला

प्रेमाचा  गुलकंद मी ही पाहीला  चाखून,
सुखाची  पाहीली  स्वप्ने ,अस्तित्वाचे भान  राखून

संसाराचा  अंक  जेव्हा झाला  सुरू
स्वार्थाचा  दैत्य  लागला , तांडवनृत्य करू

माझ्याच  माणसांचा केला  मी  विश्वासघात
शेवटी माणूस   असल्याची  दाखवली मी जात

तेव्हा  फक्त  होता  एकच   हव्यास
नोटांचा  यावा  पाऊस  माझ्याही वाट्यास
या  इर्ष्येपाठी  अनेक  घोटाळे   केले
भ्रष्ट  अधिकाऱयाचे  नाव मी उंचावर  नेले

प्रत्येक  टप्प्यावर  केली  चोरी
इमानाची  पानं  ठेवून  कोरी
निवृत्त  होण्याची वेळ  जेव्हा आली
तेव्हा  देखील  भ्रष्टपणाची  कल्पना  मनात  आली

गरीब  पाहिला  नाही,  ना  गरजू  पाहिला
येणाऱ्या   फाईली पुढे  सरकवण्यासाठी
निष्ठांचा   बाजार   होता  वाढत   राहीला

सच्चा  इमानाची  किंमत  जेव्हा  कळली,
पण  तेव्हा  मात्र  जीवनाची  पालवी  होती  गळली

आयुष्यभर  मी  इतरांची   फसवणूक  केली
त्या  कृत्याची   शिक्षा  देवाने   मला   दिली

ज्यांचासाठी   हा सर्व  घातला  घाट
त्यांनीच  मला  स्मशानाची   दाखवली   वाट

जेव्हा  माझा  अंत  झाला
तेव्हा  लोकं  म्हणाली,
"अरे ! एक   भ्रष्ट   राक्षस  नष्ट  झाला ."

मेल्यावर   मी  जाणले ,
मी  चुक लो   आहे  फार
पण  तेव्हा   मात्र ,
जगण्याचे  बंद   झाले   होते   द्वार
बंद  झाले  होते   द्वार..........

               - सौ.  कस्तुरी कुणाल देवरुखकर.


सतिश

वाह.. फारच छान..  अगदी हटके कविता लिहिलीये तुम्ही..!!

kasturidevrukhkar

खुप  खुप धन्यवाद   सतिश . तुम्हाला या कवितेचे  वेगळेपण  कळले.
तुम्ही नेहमी माझ्या कवितेला दाद देता त्याबद्दल  धन्यवाद.
              - सौ. कस्तुरी.


पवन गडदे