ट्रेन CST ते वाशी

Started by sanjay limbaji bansode, November 25, 2014, 11:23:29 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

ट्रेन CST ते वाशी
त्यात झाली माझी काशी
लड़खडत होतो मी दाराशी !

घुसलो होतो जबरदस्ती
येऊन जोरावर
उभा होतो दाराशी
एका पायावर ! !

घुसत गेले लोक
गर्दी ज्याम दाटली
चोही बाजूस चेपलो
माझी ज्याम फाटली ! !

चेपुन चेपुन दमलो
कोरड पडली घशात
नकळत घातला कुणी
हात माझ्या खिशात ! !

संधी साधून गर्दीची
हात केला साफ
चोरले सारे पैसे
बसली मला चाप ! !

ताकत लाऊन सारी
हात केला खाली
बघून धडपड माझी
पाठच्यानी मारली कानाखाली ! !

काय बोलावे कुणाला
मी फार खचलो
हात वर करून पून्हा
मी गप्प बसलो ! !

वाशीपर्यंत हात, पायची
झाली होती फाळणी
ठेचल्या गेल अंग सार
झाली त्याची चाळणी ! !

कशी बशी गाडी
वाशी स्टेशनात आली
पैसे नव्हते खिशात म्हणून
घरापर्यंत दांडीयात्रा झाली ! !

संजय बनसोडे

Kavita khup chhan aahe. Pan ajunahi changali hou shakali asati ase vatate.

sanjay limbaji bansode

काही हरकत नाही सर आपण दुसऱ्या विषयावर यापेक्षा छान विनोदी कविता करू
;D   ;D ;D

Sachin01 More

Moregs

सतिश


sanjay limbaji bansode

धन्मुयवाद मुम्बईकर

sanjay limbaji bansode

धन्यवाद मुम्बईकर
जे रोज ट्रेननी ये जा करतात
येवढ दबून चेपुन जान
कमाल आहे