अनोळखी नाते

Started by sanjay limbaji bansode, November 27, 2014, 08:44:05 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

जसा पाण्यात खेळणारा मासा
अचानक पडे  जाळ्यात !
तसे अनोळखी नाते
नकळत पड़े गळ्यात ! !

शब्दा शब्दाने वाढती शब्द
जुळून एका ठिकाणी थांबती स्तब्ध
अटके आपोआप जीव त्याच्या तावड्यात !
तसे अनोळखी नाते
नकळत पड़े गळ्यात ! !

अनोळखी नात्या सोबत
नका जुळवू नात
ना पेटनार कधीच
त्याच्या दिव्याची वात
अंधारच राहील
तुमच्या ह्रुदयाच्या आत
जसा आंधळा पड़े
चालता चालता खड्यात !
तसे अनोळखी नाते
नकळत पड़े गळ्यात ! !

संजय बनसोडे