निवडुंग हा

Started by vaby, November 27, 2014, 11:56:34 AM

Previous topic - Next topic

vaby

आयुष्य माझ होत तप्त वाळवंट
त्यांत मी उभा मी एक निवडुंग
रुक्ष उन्हाच्या झळा सोसत होतो
जगण्याची व्यर्थ धडपड करत होतो
किती वर्ष झाली मलाच माझ नाही माहित
प्रेमाचा ओलावा होता फक्त आठवणीत.
अश्या वेळी तू मेघ बनून माझ्या आयुष्यात आलीस
शीतल छाया देऊन क्षणभर रिमझिम बरसलीस...
मेघांचही दुः ख मला समजत होत
सागराला सोडून परत सागराकडेच जायच असत
वाफेचे चटके तर तुही सोसले आहेस
पण तुझ्या छायेत
आज एक निवडुंग फुलत आहे!!
त्या निवडूंगावर बरसायच कि नाही
हे त्या मेघाने ठरवावं
स्वतःच एकटेपण सरवायचं कि नाही
हे त्या मेघाने ठरवावं
निवडुंगाच की ग तो इथेच राहणार आहे.
मेघांचा मात्र तस नसत
वारा नेईल तिथे जायचा असत
पण एक आर्त विनवणी आहे
निवडुंगाची जिथे जाशील तिथे घेऊन चल
तुझ्या गडद आयुष्यात
हा निवडुंग आपला हिरवा रंग
उतरवून तुला देईल
स्वतः कडे काटे ठेवून
तुला मात्र निर्मळ प्रेमच देईल .

by VAIBHAV RANSING.
CONTACT -8454973737                                 

सतिश


MK ADMIN


मिलिंद कुंभारे