अधूरे स्वप्न ...

Started by durga, November 27, 2014, 07:03:48 PM

Previous topic - Next topic

durga

जीवनाच्या वाटेवर
अनोळखी चेहऱ्यांची माणसे इथे
वेडी मी शोधते तुला
दिसशील का कुठे
तुझ्याविना सारे क्षण माझे रिते रिते
तुझ्याविना जिणे आता मज नकोसे वाटे

अल्लड वारा रुणझुणती हाक तुझी
सळसळत्या रानातल्या फुलाचा गंध तुझा
चहूकडे तुझ्या आठवनिचे कवडसे शिपडले
क्षण जे आपण जगलो ते वेडे पिसे
तुझ्या रंगात रंगून जावे
मिठीत रेशमाच्या तुझ्या गुंतून जावे

नको वाटे हे जीवन आता
कुठे वाळवंटात शोधू मी तुला
आता वाट पानाहन्यचि झाली ही परिसीमा
नाही अर्थ जगण्यास वाटते
इंद्रधनुष्य परि विरुन गेलास
स्वप्नाचे मोकळे आभाळ हे
माझ्या हातात सोडूनी गेलास

          दुर्गा वाड़ीकर्