जिवना

Started by gajabhauchougule, November 27, 2014, 10:42:36 PM

Previous topic - Next topic

gajabhauchougule

" जिवना" (गझल)
जीवना हा तुझा व्यवहार नाही
आसवांना ही पुरेशी धार नाही

लावूनी मुखवटा फिरलो गांवात या
ओळखीचा एकही शेजार नाही

घेऊनी शपथा कुणाचे जाहले बरे
शब्दांचा माझा तसा बाजार नाही

विकायाला काढले मी स्वप्न माझे
रोख सारे कोणा उधार नाही

खोलायला हवा आता  नवा दवाखाना
औषधांचा हा खरा आजार नाही

कशी गेली वाळुनी आज सारी फुले
प्रेतावरी एक साधा हार नाही

      गजाभाऊ चौगुले
       (पेठ) वडगांव
      ९९७०२०९६३३