मला न कळले

Started by Çhèx Thakare, December 03, 2014, 09:45:47 AM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

मला न कळले ..

जगणे मला न कळले
जळणे मला न कळले
कळले कधी न वळले
जगणे मला न कळले

हसणे मला न कळले
रडणे मला न कळले
कळले कधी न वळले
घडणे मला न कळले

लढणे मला न कळले
मरणे मला न कळले
जगलो कसा सहज मी
झुरणे मला न कळले

जगणे मला न कळले
जळणे मला न कळले
कळले कधी न वळले
जगणे मला न कळले

©  चेतन ठाकरे

Ram Bedge

पाण्याचा तळ दिसत असला की,पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही.तसंच माणसाच्या बाबतीत असतं.त्याच्या मनाचा तळ समजला की, त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही... आणि नातंही स्वच्छ वाटू लागतं......
         Ram Bedge

Çhèx Thakare