वाढ माय वाढ गं !

Started by sanjay limbaji bansode, December 05, 2014, 08:46:52 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

शिळा भाकर तुकडा
दुर्डीतून काढ  गं !
दारी आले तुझ्या
वाढ माय वाढ  गं ! !

वाइट या गावचे रंक
साऱ्यानी मारले मज डंक !
दिवसभर रडला माझा कान्हा
पाजाया ना फुटे त्यास पान्हा  !
दोन दिसाची मी उपासी
आशेने आले  तुझ्या दारासी !
बाळाचे रडणे ऐकुन तरी
उघड आता कवाड गं !
दारी आले तुझ्या ; वाढ माय वाढ गं ! !

तू काही दिल्या सिवाय
ना जाणार येथून आज गं !
जरी असेल अंगी फाटकी
ना त्याची मज लाज गं !
बाळासाठी हींडे गावोगावी
त्याचाच मज ध्यास गं !
जरी नसे माझ्या पदरात काही
कोरडेच पुरवी मी त्याचे लाड गं !
दारी आले तुझ्या ; वाढ माय वाढ गं ! !

कळले मज आता
ना देणार मज तु काही !
उभी राहुन दारा
वाट तुझी मी पाही !
तुलाही चिमुरडे दोन
त्याचे पुरवसी लाड !
बघे कासावीस होउन
त्यातलं देते का थोडं !
कळले मज आता
जाते  मी  निघूनं !
नको श्राप देऊ मला
वाईट नजरेने बघूनं !
कुत्र्याला जे टाकते
ते तरी मज टाक गं !
दारी आले तुझ्या ; वाढ माय वाढ गं ! !

संजय बनसोडे


सतिश