आजही मला पुन्हा एकदा तुझ्यावरच प्रेम व्हावे..

Started by Shubham Vhaval, December 06, 2014, 11:06:56 PM

Previous topic - Next topic

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]




Prafull Chandrakant Joshi

प्रेम आहे तुझ्या वर कसे सांगू मी तुला!
जिव जडला आहे तुझ्यावर कसे सांगू मी तुला!

प्रेमाच्या त्या स्वर्गात साथ मला तू देशील का?
जिव अडकला आहे तुझ्यात
त्या जीवाला तू सांभाळशील का?

हात माझा हातात घेऊन
जवळ माझ्या तू येशिल का?
जवळ आल्यावर माझ्या
माजीच तू होशील का?





Meenakshi Mali

तुझ्या आयुष्याच्या.......

तुझ्या आयुष्याच्या वेलीवर
मला कळी बनून उमलायचंय
फुल होऊन त्याच्या गंधातून
तुझ्या आयुष्यात दरवळायचंय
तुझ्या आयुष्यात नाहीच झालं तरी
तुझ्या स्वप्नात मला यायचंय
तुझ्या बेरंगी स्वप्नांना
अनेक रंगांनी भरायचंय
तुझ्या सुखात नकोच
पण दुःखात मात्र
मला कायम तुझ्या सोबतीला रहायचय
प्रत्येक दुःखाला तुझ्या मला आपलंस करायचंय
तुझ्या काळजात खोलपर्यंत मला रहायचंय
नाही मिळालं तुझ्या सोबत जगायला
तरी फक्त तुझ्यासाठीच मला जगायचं.....



Meenakshi Mali
9503878003