मानवी मनाचा खेळ

Started by kasturidevrukhkar, December 08, 2014, 11:04:23 AM

Previous topic - Next topic

kasturidevrukhkar

मानवी मनाचा खेळ ,न कळला कधी कुणा
खेळाची चाहूल मनोभूमीवर , उमटवी पाऊलखुणा
मनोराज्यात चालतो हा खेळ,
अनिश्चित अशीच वेळ.........
मर्यादित असते जीवन .......
परंतु मानवी जीवनाची येथे रेलचेल
प्रत्येकाला धुंदी असते यशाची......
कुणाला  मात्र चिंता नसते उ द्याची
भगवंतानी निवडलेले असतात पंच
त्याचा एका हुकूमावर चालतो प्रपंच
मनामनातील खेळ असती निराळे
हर एक  खेळाचे नवे रंग  नवे तराणे
खेळाचा  सामना असतो मोठा चुर्सीचा
खेळ  रंगता सवाल नसतो मर्जीचा.
        - सौ.  कस्तुरी कुणाल देवरुखकर.


kasturidevrukhkar

खुप धन्यवाद सतिश.  तुम्ही नेहमी माझ्या कवितेला दाद देता त्याबद्दल मनःपूर्वक आभार.
        - सौ. कस्तुरी कुणाल देवरुखकर.

सतिश

तुमच्या कविता खरेच फार वैविध्यपूर्ण आणि सहज सुंदर असतात.. त्यामुळे दाद दिल्याशिवाय पुढे जाणेच होत नाही..!