तिच्या लग्नाची वरात

Started by sanjay limbaji bansode, December 09, 2014, 08:30:46 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

तुटला दांडा ; कूचली कुऱ्हाड
पडली बादली ; तुटले चऱ्हाट
वाजत गाजत आली,तिच्या लग्नाची वरात
डोळ्यात अश्रू घेउन,बघत बसलो दारात ! ! 

आली हवा, विझला दिवा
तुटली फांदी,उडून गेला थवा
तुटलेल्या ह्रुदयाचा घाव भरत होतो
लाउन कडसर विरहाची दवा ! !

कीड़ले झाड,वाळून गेले पान
पडली ठिणगी,पेटले सारे रान
अंगाची झाली लाही लाही
जळले मन, हरलो भान ! !

कूचलेल्या कुऱ्हाडीला धार कशी लावू
पाण्यात पडलेली बादली वर कशी घेऊ
झाली ती दुसऱ्याची,तिच्या जवळ कसा जाऊ
पुन्हा तिचा चेहरा,प्रेमाने कसा पाहु ! !

झाली ती आता, दुसऱ्याची सदा
टाकत होतो दुखाने,तिच्यावर अक्षदा ! !


संजय बनसोडे