*** प्रेमवेडा ***

Started by कवी-गणेश साळुंखे, December 09, 2014, 10:55:52 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

*** प्रेमवेडा ***
पाहताच तुला मी,का हरवुन जातो
सा-यात असुनही स्वताला,विसरुन जातो

कानी पडताच हसु जगाचे,भानावर येतो
प्रेमात असा तुझ्या,मी नेहमीच बदनाम होतो

मर्द मराठा गडी मी,कोणा शरण जातो
एक तुझ्याच हाती,मी शिकार होतो

भोळ्या प्रेमाची माझ्या,मी रोज गाणी गातो
तुझ्याचसाठी तुझ्यावर,मी कविता होतो

मिञमंडळीत माझ्या मी,प्रेमवेडा ठरतो
तुला सोडुन सा-या गावाला माहित होतो...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7710908264
Mumbai
Date-: 09/12/2014
Time-: 10:52

Shubham Vhaval

Awesome lines... ekk number... mast kavita...