स्पष्ट झाले पाहिजे

Started by madhura, December 13, 2014, 11:16:07 AM

Previous topic - Next topic

madhura

व्हायचे ते मोकळे अन् स्पष्ट झाले पाहिजे
साथ तू देशील कुठवर हे कळाले पाहिजे

पूर्तता एका अटीची प्रेम करताना हवी
संशयाचे भूत आधी धुम पळाया पाहिजे

राव-रंकातील खाई पेटुनी उठण्याअधी
गाळल्या घामास मोठे मोल आले पाहिजे

दंगलीने पोळल्यांची सांत्वने फसवी किती!
करवित्याचेही विधात्या! घर जळाले पाहिजे

जर वसंताने नटावे आस अंकुरली मनी
वृक्ष जाणे पान शेवटचे गळाले पाहिजे

"दे हरी बाजेवरी" हे तत्व नाही या जगी
सागरी, मोती हवे तर, मज बुडाले पाहिजे

पाप करण्याचा निराळा तर्क आहे हा किती!
स्नान गंगेचे कराया मन मळाले पाहिजे

सार का ज्ञानेश्वरीचे आठवेना शासना?
जे हवे ते ते जनालाही मिळाले पाहिजे

पाश का "निशिकांत" विणले? जे गळ्याला काचती
खेळ सरला या जगीचा, चल निघाले पाहिजे

निशिकांत देशपांडे

मिलिंद कुंभारे

सागरी, मोती हवे तर, मज बुडाले पाहिजे......

छान आहे गजल ...... :)

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]