गारपीठ

Started by Anil S.Raut, December 13, 2014, 04:46:16 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

पाहिली स्वप्ने किती या उभ्या पिकाची
लक्तरे केली गारांनी सा-या पिकाची!

पाणी कमी...आशेवर जोजले मेघा
रास दुधात ओतली का रे मीठाची!

ठेवला नवरा गहाण......बायकोचा
जरी किंमत भरमसाठ....खताची!

आस होती होईल मोकळा तो फास
पण दोरी तुझ्या हाती माझ्या गळ्याची!

शपथ सांगतो देवा...छळ तू कितीही
मागावी लागेल भीक,माझ्या जीवाची!

उभारेन कष्टाने...... पुन्हा हिरवाई
ना गरज रावाच्या,फेकल्या भिकेची!

*अनिल सा.राऊत*
9890884228