ते वडाचे झाड...

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 14, 2014, 08:53:17 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

ते वडाचे झाड....
त्या वडाच्या झाडाखाली
किती स्वप्ने रंगवली होती
मी होतो एक राजा आणि
ति माझी राणी होती
साक्षी होते ते झाड
आमच्या सुखी संसाराचे
आणि स्वप्नांत बांधलेल्या
आमच्या सोनेरी घरट्याचे
दिवस उगवत होता तसा
आनंदाने जात होता
आमच्या प्रेमाचा गुंता
झाडाखाली वाढत होता
अचानक एके दिवशी
काय झाले कुणास ठाउक
पाहिले तर त्या झाडाचा
उरला फ़क्त बुंधा होता
काय दोष होता त्याचा
ज्याने सर्वाना सहरा दिला
का मारले त्याला कोणी
ज्याला गार वारा दिला
ते झाड मेले होते
त्याचे सरपण झाले होते
माझे हक्काचे घर आता
मला परके झाले होते
मला परके झाले होते...
... अंकुश नवघरे
(स्वलिखित)
दी.१४.१२.२०१४ वेळ. ७.५५ संध्या.