आई (४ फेब्रुवारी २००७ )

Started by Vikas Vilas Deo, December 19, 2014, 08:41:53 AM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

आई     (४ फेब्रुवारी २००७ )
आई हे ईश्वराचे
पवित्र पवन नाव
माया. प्रेम आपूलकी
व वाटसल्याने गाजावाजलेले गाव.

आई हे देवासमोर
सतत जळणारी निरंजन
जगातील सर्वात मोल्यवान
कधीही न संपणारे धन

आई हे प्रेम देणारा
अमृतने वाहणारा झरा
मनाच्या जखमेवरती
मायेची फुंकर घालणारा वारा

आई हे वाटसल्याने
काठोकाठ भरलेला सागर
रसाळ मधुर वाणीने
भरलेली घागर

आई हे मृत्युवर ही
मात करू शकणारे अमृत
सदा सर्वदा आशीर्वाद
देणारा देवतुल्य हस्त