अरे शेतकऱ्याच्या पोरा

Started by sanjay limbaji bansode, December 19, 2014, 10:17:52 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

अरे  शेतकऱ्याच्या   पोरा
तुला येवढा कसला माज रं
दारू मटण खाण्याची
रोजच  तुझ्यात  खाज   रं 
सोडून दे आता तरी
थोडी  तरी  धर लाज रं ! !

बायका पोरं तुझे  उपाशी
का पैसे उधळतो वायफळ रं
दारू विकनारे खाती तुपाशी
फुकट पैसे देण्याची तुझ्यात कळ रं
दारूमुळे शेत ठेवले गहाण तु
येवढा आहेस फार महान रं
असा कसा झाला जवान तु
शेंबड्या पोरा पेक्षा बुद्धी तुझी लहान रं


वर्षभर शेतात मेहनत करती
तरीही ना घरच्यांना खुशी रं
नशीबाला दोष देत बोंबलत फिरती
तुझ्या कर्मा मुळे तुझ नसीब रूसी रं
दारू मुळे झाला कर्ज़ बाजारी
आता येऊन तुझे कोण अश्रू पुसी रं
आता एकच उरल तुझ्या पाशी
उलथ  घेउन फासी रं ! ! !

संजय बनसोडे