बोबडकांदा

Started by डॉ. सतीश अ. कानविंदे, December 19, 2014, 06:46:26 PM

Previous topic - Next topic
 बोबडकांदा

(२४ ऑगष्ट १९९७ च्या लोकसत्ता 'किशोरकुंज'मध्यें प्रकाशित)

थदले मला तिलवतात
बोबलतांदा बोबलतांदा
मला त्यांता लाद येतो
तलतो मद मी त्यांता वांदा

एतदा मी आईला म्हतलं
"दे ना मला थोलं थोबलं"
आई म्हनाली "नीत बोल
थोलून दे हे बोलनं बोबलं"

लादावलो मी थूप तेव्हां
लुतून बतलो तोपल्यात दाऊन
आईतं लत्थ नव्हतं तेव्हां
थदलं थोबलं तातलं थाऊन

ताई आनि दादा थुद्दा
तिलवून मला हैलान तलतात
"बोबलतांद्या,बोबलतांद्या"
अथीत मला हात मालतात

तोनावल मादा विथ्वात नाही
तुमीत आता मला थांदा
तुमालाही वाततं ता हो
आहे मी एत बोबलतांदा ?

विनोदी कवितांचा वाचकवर्ग जास्त आहे असे वाटते. बोबडकांदा ही कविता मी १८ नोव्हेंबरला 'बालगीत' विभागात टाकली होती. त्यात त्या कवितेला आतापर्यंत (३४ दिवसात) ३३२ views  मिळाले. पण 'विनोदी कविता' या विभागात याच कवितेला २ दिवसात २५५ views मिळाले.