सहज एकदा सायंकाळी....

Started by pankaj8590, December 19, 2014, 08:56:23 PM

Previous topic - Next topic

pankaj8590

सहज एकदा सायंकाळी गीत तुझे मी स्मरताना,
तुझेच रूप मज सवे चलावे सोबत माझ्या नसताना,
अशाच एका सायंकाळी आठवणीत या रमुन जावे,
अन मग भरल्या डोळ्यांनि मी तुझ्या भेटीचे स्वप्न पहावे...

अशाच ऐका सायंकाळी मज शब्दांचे हे काव्य फुलावे,
तुझ्याच सुंदर रूपाचे जणू शब्दातून प्रतिबिंब खुलावे,
अशाच एका सायंकाळी मी तुज अन तू मला पहावे,
अन हृदयीच्या स्पन्दनातूनि आपुल्या प्रीतिचे सूर जुळावे...

हातात घेउनि हात तुझा चांदराती या स्वच्छंद फिरावे,
अपुल्या दोघांच्या भेटिने सागरी जणू नवतरंग यावे,
या चंद्रकिरणांच्या साक्षीने मी तुज मिठीत घ्यावे,
चंद्रानेही मग मुग्ध व्हावे इतुके मोहक तू लाजावे...

रातकिड्यांच्या किरकिरण्याने रम्य स्वप्न हे भंगुन जावे,
स्वप्नातील तुझ्या ह्या भेटिने मन ही बेधुंद व्हावे,
पुन्हा एकदा सायंकाळी स्वप्नात या हरवून जावे,
पुन्हा एकदा मला सखे हे तुज प्रितीचे गीत स्मरावे...

--पंकज जाधव