एक मैत्रीच छोट घर.....!

Started by Mayur Jadhav, December 20, 2014, 07:55:33 PM

Previous topic - Next topic

Mayur Jadhav

एक मैत्रीच छोट घर.....!

एक मैत्रीच छोट घर करून राहतेस तू माझ्या मनात .....
अन मग न पाहताही कसे साठवू मी तुला माझ्या डोळ्यांत ,
असशील तू कितीही दूर तरी येते तुझी आठवण ......
अन मग मैत्रीच्या मोहक क्षणांत करतेस तू थोडी साठवण ,
गेलोच तुझ्यापासून दूर तर रागावतेस तू हट्टाने ......
अन मग मी पुन्हा आल्यावर समजावतो तुला लाडाने ,
क्षिताजावर इंद्रधनुपसरावे तसेच आपल्या मैत्रीतही आनंदाचे क्षण तू पसरवतेस ....
अन मग नेहमी चोरपावलांनी तू मला खूप खूप हसवतेस ,
खूप कामात असलीस तरी माझ्यासाठी तू थोडातरी वेळ काढतेस ......
अन मग तू नसताना मला वाट पाहायला लावून खूप सतावतेस ,
न पाहताही निभावलेली तुझीही मैत्री खूप खास आहे .....
अन मग आता मनाला तुला भेटण्याची फक्त आस आहे ...... !

मयुर जाधव ,
कुडाळ (सातारा) ,
+918888595857 .