समाज

Started by anuswami, December 21, 2014, 06:32:07 PM

Previous topic - Next topic

anuswami

समाज


शब्दाची वंजळ काय करू म्या
ना मी भिकारी ना माझ्यापाशी राज हाय
समाजाच काय घिवून बसलाईसा मंडळी
नुसता 'स' सोडाला तर बाकिचा 'माज' च हाय




भारत देस आपुला प्यारा म्हनं
शिरमंताचा बेड आन गरीबाचा बाज हाय
तरी बी आमची पोरं म्हणत्यात
येक भारतीय व्हन्यावर मला नाज हाय




'भारत माता की जय' म्हणतो छाती ठोकून
पर परतेक जातीचा हितं गाजावाज हाय
फेसबुकाव हमबिगर पोश्ट पडिते
गर्वच नाय तर --- आसल्याचा माज हाय




खायला घरात दाणा बी नसतू
पर पोरिला फेरंड लवली चा साज हाय
पोर बी हिंडत हीरो व्हंडा घिऊन
जरी घरादाराला गरीबीची खाज हाय




चूक झाली कुनाकुंड तर म्हंतो समाज
ह्याला तर काय लाज नाय
मला तर येकच कळतय बगा
जे काल व्हतं ते आज नाय




मी म्हंतो,
कायला घाबराईच समाजाले
आपण काय बुडाणारं झाज नाय
आपला समाज हाय फ़क्त भारत
आन डोसक्याव आपल्या त्याचा ताज हाय




म्हणूनच पूना सांगतो
कुणी किती बी खीचू दया तुमच पाय
समाजाच काय घेवून बसलाईसा मंडळी
नुसता 'स' सोडला तर बाकिचा 'माज' च हाय

कवी :-अनिकेत स्वामी, अकलूज.
९५५२०३०८२८

Shraddha R. Chandangir

मला तर येकच कळतय बगा
जे काल व्हतं ते आज नाय....!!!!!
.
.
vahhh....  supperrlike....
[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]

anuswami

धन्यवाद प्रतिक्रियेसाठी