"सारं काही कर पण लग्न नको करु..."

Started by Rajesh khakre, December 27, 2014, 11:34:01 AM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

सारं काही विसर पण एवढं नको विसरु...
"सारं काही कर पण लग्न नको करु..."

लग्नाआधी असतो तु राजा स्वत: च्या मनाचा
वाटेल ते करु शके गुलाम नसे कुणाचा
लग्नाचे आकर्षण मनी नको धरु...

लग्नाचा दिवस तुझ्या आनंदाचा शेवट असतो
एकदाचा साजरा कर म्हणून पुढे बँड वाजत असतो
तेथुन पुढे दुःखाचा प्रवाह होतो सुरु...

संसाराचे गाडे वेड्या लई अवघड
मजा वाटे सुरवातीला मग जाई जड
उगीच तुझ्या जीवनाची दैना नको करु...

आई सांगे एक अन् बायको दुसरेच काही
एवढ्या confusion मध्येच जीवन निघून जाई
स्वतःला तु चरख्यातला ऊस नको करु...

प्रेम आणि सुखोपभोग आहे केवळ माया
या एका मृगजळापोटी जन्म जाई वाया
रहाटाला जुंपलेला बैल नको ठरु...

रात्रंदिन संसाराचा गाडा कितीही ओढा
पोहचत नाही कुठेही बाकी राहतोच थोडा
थोडं जगून घे नको रोज रोज मरु...

आता पर्यत ज्यांनी ज्यांनी लग्न नाही केले
बहुतेक त्यातले मोठे मोठे महापुरुष झाले
ब्रम्हचर्याची महती मनी आता स्मरु...

---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

[महत्वाची टीप:-सदरील कविता वाचून लग्न वगैरे न करण्याचा धाडसी निर्णय
घेऊ नये.ही विनोदी कविता आहे उगीच गंभीरपणे घेऊ नये.लग्न झालेल्यांनी
पुन:प्रत्ययाचा आनंद(?) घेत रहावा! ]

Deepavali


सारं काही कर पण लग्न नको करु...

लग्नाचे आकर्षण मनी नको धरु...

तेथुन पुढे दुःखाचा प्रवाह होतो सुरु...

उगीच तुझ्या जीवनाची दैना नको करु...

स्वतःला तु चरख्यातला ऊस नको करु...

रहाटाला जुंपलेला बैल नको ठरु...

थोडं जगून घे नको रोज रोज मरु...

आता पर्यत ज्यांनी ज्यांनी लग्न नाही केले
बहुतेक त्यातले मोठे मोठे महापुरुष झाले
ब्रम्हचर्याची महती मनी आता स्मरु...

--------------------------------------

Rajesh,

Ramdas Swami, who had run away from the marriage place a few minutes before getting forcefully married, had later provided  in his Dasbodh the same advice as yourself to single folks. (Interested single folks might want to go through Dasbodh to locate and read the advice.) 

Apparently from your own experience, you have confirmed Ramdas's wisdom concerning married life.

Your above rhythmic composition, by the way, stands out among the hundreds posted at this web site, about 99% of which are of extremely poor quality. 


Rajesh khakre

@दीपावली madam,
आपल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद!