काय लिहावं?

Started by गणेश म. तायडे, January 04, 2015, 12:05:46 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

एकदा विचार आला
लिहावं काहीतरी
मनाला पटेल ते,
पण लिहावं काय
काही सुचेनासे झाले,
म्हटलं स्वतः बद्दल लिहु
तर माझ्यात असं काय?
म्हटलं समाजाबद्दल लिहावं
तर काय काय लिहु?
भ्रष्टाचार डोकावत आहे,
काळा पैसा वाढतच आहे,
बलात्कार होतच आहे,
गरीबी छळत आहे,
शिक्षण रेंगाळत आहे,
महागाई जाळत आहे,
स्वातंत्र्य धोक्यात आहे,
भारत अशक्त झाला आहे,
मग म्हटलं वाईट का लिहावं?
भारताला सशक्त करावं,
आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला
देशासाठी वाहून द्यावं,
सोन्यासारख्या भारताला
पुन्हा एकदा उभं करावं,
देशाच्या एकतेला
विश्वभर नाव द्यावं,
साधू संतांच्या पुण्य भूमि ला
नतमस्तक होउन पावन व्हावं,
पण सत्य कितीही कटू असले
तरी सामर्थ्याने सामोरे जावं,
भारत माझा देश आहे
भारतीय माझा धर्म आहे,
जे करेन ते देशासाठी
जगेल तर देशासाठी,
लिहता लिहता लक्षात आलं
आपण लिहत आहे स्वतः साठी
स्वतःच्या प्रगती साठी,
मग पुन्हा विचार आला
लिहावं काहीतरी...
तुमच्या आमच्या भविष्यासाठी
लिहावं काहीतरी...

- गणेश म. तायडे
  खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com

prashant morkar

खुपच छान
कविता वाचुन मलाही वाटल
लिहाव काहीतरी

गणेश म. तायडे

धन्यवाद प्रशांत