बंडखोर कवी

Started by डॉ. सतीश अ. कानविंदे, January 10, 2015, 09:48:05 PM

Previous topic - Next topic
 बंडखोर कवी
(२७ ऑक्टोबर १९९१ च्या 'लोकसत्ता' मध्यें प्रकाशित

एक कवी पेटून उठला
केले त्याने बंड
सूर्यावरती नेऊन ओतले
पाणी त्याने थंड

चंद्रावरचे डाग पाहून
मनातच तो हसला
दुस-या दिवशी जाऊन त्याने
रंग त्याला फासला

सूर्यमालेतील  सर्व ग्रह
पिशवीत त्याने भरले
समुद्रात त्यांना बुडवायचे
नक्की त्याचे ठरले

उपग्रहांनी गर्दी करून
अवकाश होते झाकले
लाथ मारून त्याने ते
पाडून सारे टाकले

फुंक मारून समुद्राला
शांत त्याने केला
पाण्यावरून चालत मग तो
जगप्रवासाला गेला

Ravi Padekar


NARAYAN MAHALE KHAROLA